माघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सव साजरी

Share Now

प्रतिनिधी : पुणे , माघ पौर्णिमेनिमित्त व माता रमाई जयंती महोत्सवनिमित्त पर्वती शिवदर्शन येथील राहुल युवक संघटना व ज्ञानदीप सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली . भारतीय बौध्द महासभा पुणे यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष के बी मोटघरे गुरुजी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी भारतीय बौध्द महासभेचे प्रचारप्रमुख व प्रमुख वक्ते डॉ सुरेश कंठाणे यांनी सांगितले कि, माता रमाई यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले , तसेच , सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती दिली , पौर्णिमेचे महत्व त्यात ” उपोसथ दिवस ” म्हणजे उपवास , धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम करतात , नवीन संकल्प करतात , बौध्द विहारात जातात , सिध्दार्थ गौतम यांचे त्या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या घटनेचे स्मरण करतात . अष्टशील ग्रहण करतात , असे सांगितले . व माघ पौर्णिमेच्या दिवशी तथागतांच्या घडलेल्या पाच गोष्टीचे कथन केले . यावेळी त्यांनी धम्माचे महत्व पटवून सांगितले .
यावेळी प्रमुख पाहुणे हिमांशू जानराव , ललिता बनसोडे , सुमन ज्ञानराव , नीलम कांबळे , रुक्मिणी कांबळे , वैभव डोळस आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक दादा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल ननावरे यांनी केले आभार भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी मानले .


Share Now